Home Mondo एकेकाळी खास पुरुषांसाठी असलेल्या या गोष्टी आता केवळ महिलांसाठीच

एकेकाळी खास पुरुषांसाठी असलेल्या या गोष्टी आता केवळ महिलांसाठीच

0
एकेकाळी खास पुरुषांसाठी असलेल्या या गोष्टी आता केवळ महिलांसाठीच

thing
‘चियरलीडर्स’ म्हणून स्पर्धेतील खेळाडूंना नृत्य करून उत्तेजन देणाऱ्या तरुणी आजकाल बास्केटबॉल, फुटबॉल सारख्या खेळांच्या स्पर्धांमध्ये नेहमीच दिसत असतात. पण एके काळी ‘चियरलीडिंग’ करण्याचे काम केवळ तरुणांचे असे. चियरलीडिंग करण्याची पद्धत १८०० सालामध्ये अस्तित्वात आली. त्याकाळी फुटबॉलच्या सामन्याइतकेच चियरलीडिंगही महत्वाचे मानले जात असे. त्याकाळी महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या तरुणांनी चियरलीडिंग टीममध्ये सहभागी होणे हे मोठे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जात असे. महाविद्यालयातील लोकप्रिय विद्यार्थी या टीममध्ये असत. अमेरिकेचे राष्ट्रपती ड्वाइट आयजेनहाउअर, फ्रँकलीन रुजवेल्ट, आणि रोनाल्ड रेगनदेखील महाविद्यालीन जीवनामध्ये चियरलीडर्स होते. आता मात्र चियरलीडिंग केवळ तरुणी करताना दिसतात.
thing1
पूर्वीच्या काळी टेलिफोन ऑपरेटर्स म्हणून सुरुवातीला पुरुष कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात असे. पण महिलांचा आवाज फोनवर ऐकण्यास जास्त मधुर असल्याने पुरुष टेलिफोन ऑपरेटर्स कमी केले जाऊन हळू हळू महिलांची या कामी नियुक्ती केली जाऊ लागली. एमा नट नामक महिला जगातील पहिली टेलिफोन ऑपरेटर बनली. महिलांची भाषा नम्र असून, अतिशय मधुर आवाजामध्ये संभाषण साधण्याचे कसब त्यांना अवगत असल्याने महिलांनाच या कामी नेमले जाऊ लागले. आजही आपण फिरविलेला नंबर व्यस्त असेल तर तसे सांगणारा ऑटोमेटेड आवाजही महिलेचाच असतो.
thing2
उंच टाचांचे बूट किंवा हाय हील्स हे आजच्या काळामध्ये महिलांसाठीच उपलब्ध असतात. पण एके काळी हाय हील्स केवळ पुरुषांसाठी बनविले जात असत. नवव्या शतकामध्ये पर्शियन घोडेस्वारांनी हे बूट वापरण्याची फॅशन अस्तित्वात आणली. घोड्याच्या रीकीबीतून पाय निसटू नयेत म्हणून उंच टाचांचे बूट घालण्याची पद्धत या घोडेस्वारांनी अवलंबिली होती. त्यानंतर पर्शियन राजघराण्यामध्येही हे बूट वापरले जाऊ लागले. जेव्हा पर्शियन राजदूत राजनैतिक भेटीगाठींसाठी युरोपमध्ये आले. तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांची उंच टाचांच्या बुटांची फॅशन देखील युरोपमध्ये प्रवेश करती झाली. उंच टाचांचे बूट घालण्याची ही पद्धत केवळ उच्चभ्रू घराण्यांपुरतीच मर्यादित असल्यामुळे अश्या प्रकारचे बूट घालणे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जात असे. फ्रांसचा राजा सोळावा लुई हा देखील आपली उंची जास्त दिसावी याकरिता लाल रंगाच्या उंच टाचांच्या बुटांचा वापर करीत असे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here