नवी दिल्ली – पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या निर्णयाबद्दल बरीच चर्चा झाली होती. कोण विजेता होईल, हे निश्चित करण्यासाठी किमान तीन कसोटी सामन्यांची मालिका असायला हवी होती, असेही म्हटले जात होते. पण हा सामना रद्द झाला किंवा अनिर्णित सुटला तर विजेता कोण असेल, हा प्रश्न सर्वांच्या मनात घर करुन होता. आता या प्रश्नाचे उत्तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने दिले आहे.
हा सामना रद्द झाला किंवा अनिर्णित सुटला तर दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेता घोषित करण्यात येईल, असे आयसीसीने सांगितले आहे. हा सामना साऊथम्प्टनच्या हॅम्पशायर बाउल १८ जून ते २२ जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. त्याचबरोबर २३ जून हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. हे दोन्ही निर्णय २०१८ मध्येच घेण्यात आले होते.
भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा.
न्यूझीलंड – केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोम, जैकब डफी, मॅट हेनरी, काइल जेमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेनरी निकोलस, एजाज पटेल, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनेर, टिम साउथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वाटलिंग (यष्टीरक्षक), विल यंग.
“Esploratore. Appassionato di bacon. Social mediaholic. Introverso. Gamer. Studente esasperatamente umile.”