वॉशिंग्टन : अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून येत्या 20 जानेवारीला जोय बायडेन हे शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर त्यांचे 2007 पासूनचे स्वप्नही पूर्ण होणार आहे. जेव्हा व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफीसमध्ये बायडेन राष्ट्राध्यक्ष म्हणून पोहोचतील तेव्हा ते जगातील सर्वात शक्तीशाली पदाची सूत्र सांभाळतील. जेव्हा जो बायडेन राष्ट्राध्यक्ष बनतील तेव्हा त्यांना किती पगार मिळेल? हे तुम्हाला माहित आहे का? पगारासोबतच अनेकप्रकारचे भत्तेही जो बायडेन यांना मिळणार आहेत.
दरवर्षी 400,000 डॉलर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षंना पगार मिळतो. म्हणजेच भारतीय रुपयांप्रमाणे जवळपास तीन कोटी रुपये. यामध्ये भत्ता म्हणून 50,000 डॉलर मिळतात. 1,00,000 डॉलर नॉन टॅक्सेबल ट्रॅव्हल अकाउंट असतो. तर मनोरंजनासाठी 19,000 डॉलर मिळतात. जर एका सामान्य अमेरिकेच्या कर्मचाऱ्याचा विचार केला तर ते वर्षाला 44, 564 डॉलर कमावतात. म्हणजेच जवळपास 32,60,828 रुपये कमावतात.
एका अमेरिकन राष्ट्राध्यक्षला पगाराशिवाय लिमोजिन, मरीन वन आणि एअरफोर्स वनमध्ये होणाऱ्या यात्रा पूर्णपणे फ्री असते. सोबतच व्हाईट हाऊसमध्ये राहणे देखील मोफत असते. तसेच, निवृत्त झाल्यानंतर माजी राष्ट्राध्यक्ष सरकारी पेरोलवर असतात. दरवर्षी त्यांना 200,000 डॉलर म्हणजेच 1 कोटी 46 लाख 34 हजार 360 रुपये पेन्शन आणि आरोग्य विमा मिळतो. त्याचबरोबर ऑफीशिअल प्रवासही मोफत असतो. 400,000 डॉलरच्या पगारासोबत राष्ट्राध्यक्ष हे अमेरिकेत सर्वात जास्त पगार घेणारे व्यक्ती असतात. पण अमेरिकेच्या फर्स्ट लेडीला म्हणजेच राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला कुठलाही पगार मिळत नाही.